आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत काँग्रेसचा फक्त अडीच तास उपवास; संजय ‍‍निरुपम म्हणाले, हे सांके‍तिक उपोषण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई काँग्रेस अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे शिवाजी टर्मीनस जवळील आझाद मैदानाबाहेर पक्षाच्या नेत्यांनी सोमवारी अडीच तासाचा लाक्षणिक सामुहिक उपवास दिन पाळला. सकाळी अकरा ते दुपारी दीड या वेळेत काँग्रेसच्या नेत्यांनी हा उपवास केला. यावेळी उपस्थित नेते-कार्यकर्ते यांनी सामुहिकपणे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आवडती ‘वष्णैव जन तो तेने कहिए’ आदी भजन उपवास मंडपात गायली. 


उपवास संदर्भात निरुपम म्हणाले की, ‘मोदी सरकारच्या द्वेषपूर्ण, दलितविरोधी भूमिकेमुळे भीमा-कोरेगाव सारख्या हिंसाचाराच्या घटना देशात घडत आहेत. भाजप सरकार आजपर्यंत कायमाच जातीयवादाच्या भूमिकेवर राजकारण करत आले आहे. त्यामुळेच देशातील नष्ट होत चाललेला सामाजिक सलोखा पूर्नस्थापीत करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी उपवास दिन पाळला,’ असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

 

या सामुहिक उपवासात माजी खासदार मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सुरेश शेट्टी, आमदार असलम शेख, वर्षाताई गायकवाड, नसीम खान, अमिन पटेल, भाई अशोक जगताप, माजी आमदार चरणसिंह सपरा, मधु चव्हाण, बलदेव खोसा, प्रवक्ते अरुण सावंत, मनपा विरोधीपक्ष नेते रावी राजा, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. अजंता यादव बेस्ट समितीचे सदस्य भूषण पाटील आदी पदाधिकारी होते. 

बातम्या आणखी आहेत...