आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • मुलाचे नाव ठेवण्यासाठी या दाम्पत्याने घेतली निवडणूक; नातेवाइक मित्रांनी केले मतदान Couple Held Election To Choose Babys Name

मुलाचे नाव ठेवण्यासाठी या दाम्पत्याने घेतली निवडणूक; नातेवाईक-मित्रांनी केले मतदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- लोकशाहीत देशात सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून जनता आपले सरकार निवडून देत असते. परंतु मुलाच्या नामकरणाला निवडणूक घेतल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. मुलाचे नाव काय ठेवावे, यावर दाम्पत्यात एकमत न झाल्याने चक्क बारशाच्या दिवशी बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घेण्यात आले. 

 

नातेवाईक-मित्रांनी केले मतदान...

- गोंदिया जिल्ह्यात राहाणारे मिथुन आणि मानसी या दाम्पत्याला 5 एप्रिल रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु मुलाचे नाव काय ठेवावे, यावर मिथुन आणि मानसीमध्ये एकमत झाले नाही.
- यावर तोडगा काढण्यासाठी मुलाच्या बारशाच्या दिवशी अनोखी निवडणूक घेऊन मुलाचे नाव ठेवण्यात आले.

- निवडणूक आयोगाच्या धर्तीवर मुलाचे नाव निश्चित करण्‍यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली.

- मुलाचे नाव ठेवण्यावरून मिथून आणि मानसीमध्ये काट्याची लढत झाली. नातेवाईकांनी मुलासाठी यक्ष, योवीक आणि युवान अशी तीन नावे सुचवली होती. नातेवाइक आणि मित्रांनी बॅलेट पेपरच्या माध्यमातून तीन पैकी एक नाव लिहून मतदान केले.

 

'युवान' नावाला मिळाले सर्वाधिक मते..
- 15 जून रोजी मतदान झाले. एकून 192 जणांनी मतदान केले. त्यापैकी सर्वाधिक 92 मते 'युवान' या नावाला मिळाले.
- समोर आलेल्या निकालानुसार, मिथुन आणि मानसीच्या मुलाचे नाव युवान असे ठेवण्यात आले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...मुलाच्या नामकरणासाठी घेतलेल्या मतदानाचे फोटो

बातम्या आणखी आहेत...