आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोलीत CRPF च्या जवानाने दोन सहकारी जवानांवर झाडल्या गोळया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- केंद्रीय राखीव दलाच्या माथेफिरु जवानाने आपल्या दोन सहकारी जवानांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे मंगळवारी रात्री घडली. या गोळीबारात दोन्ही जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.

 

गोळीबार केलेला जवान गोळ्या झाडून फरार झाला होता, मात्र नंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. संजय शेंद्रे असे आरोपी जवानाचे नाव आहे.

 

सूत्रांनुसार, एटापल्ली येथे तैनात असलेल्या 191 बटालियनच्या संजय शेंद्रे याने सहकारी जवान शंकपाल विलासमूर्ती आणि एस.एच.इंगळे या दोघांवर गोळीबार केला. मंगळवारी रात्री 11 ते 12  च्या दरम्यान ही थरारक घटना घडली. एच.एस.इंगळे यांच्या पोटात, तर शंकपाल यांच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे.

 

प्रकृती चिंताजनक... नागपूरला हलवले...

दोन्ही जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पहाटे 3 वाजता नागपूरला हलविण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...