आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Nagpur: या अवस्थेत आढळला शिवसेना आमदाराचा खासगी सचिव..हत्या की आत्महत्या, कारण अस्पष्‍ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पावसाळी अधिवेशन सुरु होण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना नागपुरातील आमदार निवासात मृतदेह सापडल्याचे खळबळ उडाली आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या विंगमधील खोली क्रमांक 46 मध्ये हा मृतदेह आढळला आहे. विनोद अग्रवाल असे मृत व्यक्तिचे नाव असून ते अंधेरी (मुंबई) पूर्वचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे खासगी सचिव असल्याचे सांगितले जात आहे.

 

पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. विनोद अग्रवाल यांचा मृत्यू हृदयविकाराचा धक्क्याने झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, विनोद अग्रवाल यांनी सकाळी बराच वेळ झाला तरी खोलीचा दरवाजा उघडला नाही. नंतर दरवाजा तोडल्यानंतर हा धक्कादायक घटना उघडकीस आली.

दरम्यान, यंदा पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. 4 ते 20 जुलै या काळात अधिवेशन चालणार आहे. सर्व आमदार अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाले आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...