आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिडेंना अटक, शिक्षक वेतनाच्या मागणीवरून परिषदेत गोंधळ; कामकाज चारदा तहकूब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, विनाअनुदानित शिक्षकांचे वेतन आणि नियम २६० नुसार शेतकरी चर्चेत कृषी विभागासह संबंधित विभागाचे सचिव उपस्थित नसल्याच्या कारणावरून विधान परिषदेचे कामकाज चारदा तहकूब करण्यात आले. 

   
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाची द्विसदस्यीय आयोगाकडून चौकशी सुरू आहे. शरद रणपिसे यांनी ३१ जुलैपूर्वी न्यायालयीन चौकशी आयोगाकडून मागवणार काय? असा सवाल केला. त्यावर मुदत १५ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे त्यानंतरच अहवाल मागवता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करत वेलमध्ये येऊन घोषणा द्यायला सुरुवात केल्याने सभापतींनी परिषदेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. 


विनाअनुदानित शिक्षकांचे वेतन रखडलेले आहे. शिक्षक आपल्या मागण्यांसाठी मोर्चा घेऊन आलेले आहेत. तेव्हा त्यांच्या समस्यांवर कामकाज थांबवून चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी विक्रम काळे यांनी केली. त्याला कपिल पाटील यांनी समर्थन दिले. परंतु विषय कामकाजात नसल्याने चर्चा होणार नाही, असे सभापतींनी सांगितल्याने सभागृहाचे ४५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.  


आता जगतापांचे काजू   
आंबा खाऊन मुले होतात, असे भिडे म्हणाले. मुली हाेतात, असे ते का नाही म्हणाले. म्हणजे मुलींना त्यांचा विरोध आहे का, असा प्रश्न विद्या चव्हाणांनी केल्यावर सभागृहात हशा पिकला. भिडेंच्या आंब्यांवर काँग्रेसचे भाई जगताप यांनी काजूचा उतारा दिला. ‘आंबे आंबे काय करताय, आमच्या कोकणात या, काजू दाखवतो. आंब्यांपेक्षा काजू चांगले आहेत’, असे भाई जगताप म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

 

बातम्या आणखी आहेत...