आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवद्‍गीता वाईट आहे, हे विरोधकांनी जाहीर करावे, तावडेंचे आव्हान; नाणारवरून काँग्रेस-शिवसेनेत जुंपली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- मुंबईतील महाविद्यालयात भगवद्गीता वाटप आणि कोकणातील नाणार प्रकल्पावरून विधानसभेत गुरुवारी पुन्हा गदारोळ झाला. भगवद्‍गीता वाटपाच्या सरकारच्या निर्णयावरू विरोधक आक्रमक झाले तर नाणार प्रकल्पावरून काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये जुंपली. गोंधळ कमी न झाल्याने विधानसभा तसेच विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.

 

मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवद्गीतेचे वाटप करण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. सरकारच्या या निर्णयावर विरोधी प्रतिक्रिया उमटल्यानंतर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तावडे म्हणाले की, 'सरकार भगवदगीतेचे वाटप करत नाही. भिवंडीची भक्ती वेदांत संस्था आमच्याकडे भगवद्‍गीतेचे वाटप करावे, अशी मागणी घेऊन आली होती. मोफत वाटप करण्याचा त्यांचा प्रस्ताव होता. भगवदगीतेचे वाटप कोणत्या महाविद्यालयांमध्ये करावा, याबाबत उच्च शिक्षण विभागाने परिपत्रक काढले. तुमची कुराण आणि बायबलचे वाटप करावे, अशी मागणी झाली तर तेही करु.'

 

भगवद्‍गीता वाईट आहे, हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवाद्यांनी जाहीर करावे. श्रीकृष्ण खोटे बोलत होते असे त्यांचे मत आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही विनोद तावडे यांनी विरोधकांना केले आहे.

 

दरम्यान, उच्च शिक्षण विभागाने मुंबईतील सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये भगवद्‍गीतेचे वाटप करण्याची सूचना दिली आहे. याबाबत उच्च शिक्षण विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे.

 

मुंबई आणि मुंबई उनगरामधील ज्या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनामध्ये अ/अ+ प्राप्त आहेत, अशा 100 महाविद्यालयांमध्ये आता भागवद्‍गीतेचे वाटप केले जाणार आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...