आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर कारागृहातील गोदामाला भीषण आग, कापडाचा साठा आणि फर्निचरची राखरांगोळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नागपुरातील मध्यवर्ती कारागृहातील कापडाच्या गोदामाला सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत आगीत मोठ्या प्रमाणात कापडाचा साठा आणि फर्निचरची राखरांगोळी झाली.

 

मध्यवर्ती कारागृहातील या गोदामात प्रामुख्याने कापड, फर्निचर आणि भंगाराचे सामान ठेवलेले होते. दुपारी दीड ते दोनच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे कारागृह प्रशासनाची तारांबळ उडाली. अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. आगीचे स्वरुप लक्षात घेऊन आगीचे आठ बंब घटनास्थळी बोलावण्यात आले होते. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आल्याची माहिती कारागृह उपमहानिरीक्षक देसाई यांनी दिली.

 

आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कारागृह प्रशासनाने त्याची चौकशी सुरु केली असल्याची माहिती देसाई यांनी दिली. कैद्यांच्या बॅरकपासून हे गोदाम दूर असल्याने सर्व कैदी सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...