आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीचा सेल्फी काढण्यास नकार; गुंडाने केला गोळीबार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- वाढदिवसाच्या पार्टीत शिरलेल्या गुंडाने तरुणींसोबत सेल्फी काढण्याची मागणी केली. तरुणींनी नकार दिल्याने गुंडाने पिस्तुलातून गोळी झाडल्याची घटना   नागपुरात एमआयडीसी परिसरातील एका बारमध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.   


एमआयडीसी परिसरातील झीरो डिग्री बारमध्ये राजेश कुशवाह या व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर असलेल्या युवकाची वाढदिवसाची पार्टी सुरू होती. त्यासाठी त्याच्या मित्र-मैत्रिणी जमलेल्या होत्या. त्याचवेळी गुंड मिहीर मिश्रा हा त्याच्या साथीदारांसह बारमध्ये होता. पार्टीत सेल्फी काढली जात असताना मिहीर तिथे पोहोचला. पार्टीतील लोकांनी त्याच्यासोबतही सेल्फी काढण्याचा त्याने आग्रह धरला. मात्र, तरुणींनी त्यास नकार दिल्याने मिहीरने गोंधळ घातला. आपण नागपुरातील कुख्यात टोळीचा सदस्य असल्याचे सांगत त्याने त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्याचवेळी या पार्टीचा आयोजक राजेश कुशवाहने मिहीरला समजावण्याचा प्रयत्न केला.

 

मात्र, संतापलेल्या मिहीरने स्वत:जवळील पिस्तूल काढत हवेत गोळीबार केला. त्यामुळे पार्टी लागलीच थांबवण्यात आली. दरम्यान, मिहीर साथीदारांसह तेथून पसार झाला. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला देण्यात येताच एमआयडीसी पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. तक्रारीवरून मिहीरवर गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...