आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 53 बोगस डॉक्टरांवर 26 जुलैपर्यंत कारवाई; गिरीश महाजन यांची विधानसभेत माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्यातील 53 एमबीबीएस डॉक्टरांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीसाठी दिलेली अतिरिक्त पदवी (पोस्ट ग्रॅज्युएट) बोगस असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या डॉक्टरांची नोंदणी 26 जुलैपर्यंत रद्द करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी तारांकित प्रश्नावरील चर्चेत दिली.

 

अनंत गाडगीळ, संजय दत्त, हेमंत टकले आदींनी या प्रकरणी उपप्रश्न विचारले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून बोगस डिग्रींचा तपास करत आहेत. सरकार स्वत:हून या प्रकरणी तपास करत आहे, असे महाजन यांनी सांगितले.

 

मेडिकल रिपोर्ट न पाहता सही करणाऱ्या चार पॅथॉलॉजिस्टविरुद्ध दोषारोप सिद्ध झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. बोगस डिग्री असलेल्या 20 डॉक्टरांवर यापूर्वीच कारवाई करण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. 

 

उच्चभ्रू समाजातील विद्यार्थ्यांचीही एससी प्रमाणपत्रे  
उच्चभ्रू समाजातील विद्यार्थ्यांनी अनुसूचित जातीची प्रमाणपत्रे सादर केली आहेत. आता शहा आडनाव असलेला विद्यार्थी एससी कसा, असा प्रश्न एक डिग्री पाहून माझ्या मनात आला, असे सांगतानाच मला येथे उच्चभ्रू समाजातील विद्यार्थ्यांची नावे सांगायची नाहीत, अशी मल्लिनाथीही महाजन यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...