आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग तरुणाचा विधानभवनासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; अनर्थ टळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- उपराजधानीत सुरू असलेल्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी अात्मदहनाचा प्रयत्न झाला. बुधवारी महापालिका कर्मचाऱ्याने प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी टाेकाचे पाऊल उचलले हाेते, सुदैवाने पाेलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला. त्यापाठाेपाठ गुरुवारीही एका दिव्यांग व्यक्तीने अंगावर राॅकेल अाेतून घेतले. 


पाेलिसांनी तत्परतेने अंगावर पाणी अाेतून त्याला ताब्यात घेतले. 'अाेसीडब्ल्यू'च्या पाणीपुरवठा करणाऱ्या एका टॅँकरने अाशिष अामदरे या अपंग व्यक्तीला काही दिवसांपूर्वी धडक दिली हाेती. याविषयी त्याने पाेलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी दाद दिली नव्हती. त्यामुळे अाशिषने अाज विधिमंडळासमाेर अंगावर राॅकेल अाेतून घेतले. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...