आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात पावसाचा कहर..10 जुलैपर्यंत वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर/अकोला- भारतीय हवामान खात्याच्या नागपूर कार्यालयाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आगामी 10 जुलैपर्यंत अकोल्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पाऊस, अतिवृष्टी व वीज पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे पूर्णा नदीसह जिल्ह्यातील इतर नदी-नाले व प्रवाहांच्या काठांवर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. या संदेशाची माहिती जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांना अग्रेषित करण्यात आली आहे.

 

नागपुरात पावसाचा कहर..6 तासांत तब्बल 263 मि.मी. पाऊस

नागपुरात पावसाने कहर केला असून सहा तासात तब्बल 263 मि. मी. पाऊस झाल्यामुळे शहर पूर्णपणे जलमय झाले होते. संपूर्ण रस्त्यांवर पाणीच पाणी आहे. रविभवन, नागभवन येथील मंत्र्यांच्या बंगल्यांमध्येही पाण्याने वेढले होते. नागपुरातील गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो झाल्यामुळे तलावाचे गेट उघडण्याचे  आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सूरज नगर, संगम नगर, मानकापूरजवळील पिवळी नदीला लागून असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. वढाव व नांद प्रकल्प 90 टक्के भरल्याने धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. प्रशासनाने नदी काठावरील नागरिकांना सावध राहाण्याचे आवाहन केले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... नागपुरात पावसाचा कहर....