आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चंद्रपूर सर्वाधिक HOT; नागपूर, परभणी, जळगावसह राज्यातील 18 जिल्ह्यात उष्णतेची लाट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विदर्भातील अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. सोमवारपर्यंत ही स्थिती कायम राहाणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान कार्यालयाने दिला आहे.

 

महाराष्ट्रातील 18 हून अधिक जिल्ह्यांत पारा 40 अंशांवर पोहोचला. चंद्रपूरमध्ये 45.9 अंशांसह सलग तिसऱ्या दिवशी देशात सर्वाधिक तापमान नोंदवण्यात. तर सर्वच जिल्ह्यांत तापमान 41 अंशांवर नोंदवण्यात आले आहे. तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातही तापमानात लक्षणीय वाढ दिसून आली. मराठवाड्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत तापमान 40 अंशांवर राहिले.

 

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात विदर्भात उष्णतेची लाट आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. विदर्भात दोन दिवसांपासून उष्णतेची लाट असून ती सोमवारपर्यंत  (23 एप्रिल) कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात रविवारपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

 

तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस
मंगळवारी (24 एप्रिल) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... राज्यातील प्रमुख शहरांतील तापमान...

बातम्या आणखी आहेत...