आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीसह च‍िमुरडीला विष पाजून फासावर लटकविले; नंतर पतीनेही लावून घेतला गळफास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पत्नीसह दीड वर्षाच्या मुलीला विष पाजले, नंतर त्यांना फासावर लटकावून पतीने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात ही घटना घडली आहे. मृत आर्वी येथील आष्टी (शहीद) येथील रहिवासी असल्याचे समजते. 

 

अनिल नारायण वानखडे (वय-37),पत्नी स्वाती अनिल वानखडे (वय- 32), मुलगी आस्था (वय- दीड वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

 

मिळालेली माहिती अशी की, अनिल यांचे वडिलांसोबत वाद झाला होता. काल (ता.12) सायंकाळी सात वाजता पत्नी स्वाती आणि मुलगी आस्था हिला घेऊन घराबाहेर पडले. अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात अनिल यांनी पत्नी आणि मुलीला विष पाजले. नंतर दोघींना झाडाला दोरी बांधून त्यांना फाशी लावली. नंतर अनिल यांनी स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अंगावर शहारे आणणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...