आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद- गडचिरोली बस नाल्याच्या पुरात वाहून गेली, गावकर्‍यांच्या सतर्कतेमुळे प्रवासी थोडक्यात बचावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- हैद्राबाद-सिरोंचा-गडचिरोली या हिरकणी बस आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील नंदीगाव जवळील नाल्यावरील पुराच्या पाण्यात वाहून गेली. ही बस हैदराबादहून गडचिरोलीकडे जात होती. अपघात झाला तेव्हा बसमध्ये 20 प्रवाशी होती. गावकर्‍यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांसह चालक-वाहकाला सुखरूप बाहेर  काढण्यात आले आहे. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडे चार वाजता घडली.

 

सोमवारी सकाळी ही परत येत असताना आलापल्लीपासून 30 किमी अंतरावर असलेल्या नंदीगावजवळील नाल्यावरील पुराच्या पाण्यात अडकली. पुलावरून पाणी वाहत असताना चालकाने बस निघेल या उद्देशाने बस टाकली. मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्याने बस पाण्यामध्ये वाहून जाऊ लागली. यावेळी बसमध्ये 20 प्रवासी होते. ग्रामस्थांनी सतर्कता दाखवून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. गडचिरोली आगाराची ही बस आहे.

 

बातम्या आणखी आहेत...