आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोतमांगेंना जाऊन एक वर्ष पूर्ण..अजूनही न्यायाची प्रतिक्षा, असे घडले खैरलांजी हत्याकांड!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर गाजलेल्या खैरलांजी हत्याकांडातील एकमेव साक्षीदार भैयालाल भोतमांगे यांना जगाचा निरोप घेऊन (21 जानेवारी) एक वर्ष पूर्ण झाले. न्यायासाठी भोतमांगे यांनी जीवाचे रान केले. सध्या या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

 

विझली प्राणज्योत...

भोतमांगे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना भंडारा येथून तातडीने नागपूर येथे हलविण्यात आले होते. डॉ.महेश फुलवाणी यांनी त्यांना तपासण्यापूर्वी त्यांची प्राणज्योत विझली होती.


दलित कुटुंबातील चौघांची अमानुष हत्या
29 सप्टेंबर 2006 रोजी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातल्या खैरलांजी गावात भोतमांगे यांच्या कुटुंबातील चौघांची अमानुष हत्या झाली होती. या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळापासून संसदेपर्यंत उमटले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली. घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले होते. घटनेनंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल 15 सप्टेंबर 2008 रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले.

 

खैरलांजी गावात घडलेल्या या हत्याकांड प्रकरणाला गेल्या 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या या प्रकरणात एका दलित कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती (सुरेखा भोतमांगे, प्रियांका भोतमांगे, रोशन भोतमांगे आणि सुधीर भोतमांगे) सुरेखा यांचे पती म्हणजेत प्रियंका आणि रोशन, सुधीर यांचे वडील भैय्यालाल भोतमांगे हे एकटे या हत्याकांडातून बचावले होते. हत्येपूर्वी दोन पीडितांवर सामुहिक बलात्कार झाल्याचेही समोर आले होते.

 

या हत्याकांड प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने सहा आरोपींना फाशी आणि दोघांना जन्मठेप सुनावली होती. मात्र हायकोर्टात या निर्णयात बदल झाला. हायकोर्टाने फाशी रद्द करत सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली होती. सध्या या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, काय होती नेमकी खैरलांजीतील घटना...

बातम्या आणखी आहेत...