आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोडेबाजार टाळण्‍यासाठी सर्वपक्षीयांकडून प्रयत्न..विधानपरिषदेच्या सर्व 11 जागा बिनविरोध होणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर/मुंबई- घोडेबाजार टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीयांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे विधानपरिषदेच्या 11 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

 

11 जागांपैकी 5 जागांवर भाजप उमेदवार देणार आहे,  तर शिवसेना 2, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी एका जागेवर आपला उमेदवार उभा करणार आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील हे देखील अर्ज भरणार असल्याची माहिती मिळाली आहे. 11 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणार उतरणार असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे.

 

विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम...

- विधानपरिषदेचा कार्यकाळ 27 जुलै 2018 रोजी त्यांचा संपणार आहे.

- 16 जुलैला या जागांसाठी निवडणूक होणार आहे.

- 5 जुलैला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून 9 जुलैपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल.

 

भाजपने जाहीर केली पाच उमेदवारांची नावे...

- महादेव जानकर

- विजय (भाई) गिरकर

- राम पाटील रातोळीकर 

- रमेश नारायण पाटील

- नीलय नाईक

 

शिवसेना उमेदवारांची नावे..

- अनिल परब

- मनिषा कायंदे

 

काँग्रेस उमेदवारांची नावे..

- शरद रणपिसे

- डॉ. वजाहत मिर्झा

बातम्या आणखी आहेत...