आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर: संपकरी कर्मचार्‍यांवर मेस्माअंतर्गत कारवाई, संप करणारे 17 चालक आणि वाहक बडतर्फ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- महापालिकेच्या 'आपली बस सेवे'चे चालक आणि वाहक मंगळवारपासून संपावर आहेत. त्यामुळे नागपूरकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यात आजपासून (बुधवार) 12 वीच्या परीक्षा सुरु झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपली बससेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांची मदत घेतली आहे. पोलिस बंदोबस्तात बस डेपोमधून बाहेर काढण्यात आल्या.

 

भारतीय कामगार सेना संपावर ठाम

नागपूर महापालिकेची आपली बससेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी प्रयत्न सुरु असताना भारतीय कामगार सेनेनं संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी काही संपकरी कर्मचार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 

मेस्मा लागू...

मंगळवारी मेस्मा लागू झाल्यानंतर अनेक चालक आणि वाहक आज (बुधवारी) सकाळी डेपोत पोहोचले. संपकरी कर्मचार्‍यांवर मेस्माअंतर्गत कारवाई, संप करणारे 17 चालक आणि वाहक बडतर्फ करण्यात आले आहे  

बातम्या आणखी आहेत...