आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान भवनाबाहेर महापालिका कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; \'मुख्यमंत्री मुर्दाबाद\'च्या दिल्या घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- आपल्याला नोकरीवर घेण्यात यावे, या मागणीसाठी महापालिकेतील प्रकाश बरडे या कर्मचाऱ्याचा विधान भवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. या घटनेने काही काळ खळबळ माजली होती. 

 

2001 मध्ये महापालिकेने नोकर भरतीची जाहिरात दिली होती. या नोकर भरतीत एकूण 124 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. यामध्ये काहींना अर्ज न करताच नोकरीवर घेण्यात आले. काहींना अर्ज करूनही मुलाखतीला बोलावण्यात आले नाही. असे एकूण 18 जण होते.

 

नोकर भरतीत घोटाळा झाल्यामुळे ही नोकर भरती रद्द करण्यात आली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 106 जणांना परत नोकरीवर घेण्यात आले, तर 18 जणांना कामावर घेण्यात आले नाही. यातील एका कर्मचाऱ्याचे निधन झाल्याने आता 17 कर्मचारी आहेत. यापैकी एक प्रकाश बरडे आहे. 2106 मध्ये या 18 जणांना नोकरीत घेण्याचा ठराव पारित करून महापालिकेने सरकारकडे पाठवला. परंतु सरकारने आपणच निर्णय घ्यावा, असे सांगत ठराव महापालिकेकडे परत पाठवला. तेव्हापासून हे 17 कर्मचारी संघर्ष करीत आहेत.

 
मुख्यमंत्र्यांच्या निवासावर आत्मदहनाचा इशारा
प्रकाश बरडे यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. बरडे यांची मुलगी शिक्षणाची असून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे. त्यातूनच बरडे यांनी बुधवारी विधान भवनाबाहेर पत्रके भिरकावीत "मुख्यमंत्री मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या. मात्र सतर्क झालेल्या पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक केली.

 

बातम्या आणखी आहेत...