आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायमूर्ती बीएच लोया यांचा मृत्यू हार्ट अटॅकनेच; नागपूर पोलिसांनी केला महत्त्वपूर्ण खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सीबीआयचे न्यायाधीश बीएच लोया यांच्या मृत्यूप्रकरणी देशातील वातावरण तापले असताना नागपूर पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा नागपूर पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी हा दावा पोस्टमार्टम आणि फॉरेंन्सिक रिपोर्ट्‍सच्या हवाल्याने केला आहे.

 

नागपूरचे पोलिस सआयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितले की, नागपूर पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास केला आहे. न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला आहे. त्यांच्या शरीरात कोणतेही आक्षेपार्ह द्रव्य आढळून आले नसल्याचा खुलासा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची आवशक्यता नसल्याचे शिवाजी बोडखे यांनी म्हटले आहे. न्यायमूर्ती लोया यांचा मुलगा अनुज लोया यानेही कोणतीही चौकशी करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

 

'त्या' 4 न्यायाधीशांची सरन्यायाधीशांसोबत 15 मिनिटे चर्चा
दरम्यान, पत्रकार परिषद घेणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या 4 ज्येष्ठ न्यायाधीशांनी आज (मंगळवार) सरन्यायाधीशांची भेट घेतली. सुमारे 15 मिनिटे ही भेट चालली. त्यापूर्वी, मंगळवारी अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल आणि सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने म्हटले की, या प्रकरणी लवकरच तोडगा निघेल. सोमवारी वेणुगोपाल म्हणाले होते की, प्रकरण मिटले आहे. हे चहाच्या कपातील वादळ होते, असेही ते म्हणाले होते. 12 जानेवारीला जस्टीस चेलमेश्वर, जस्टीस कुरियन जोसेफ, जस्टीस रंजन गोगोई आणि जस्टीस मदन बी लोकुर यांनी पत्रकार परिषद घेत सरन्यायाधीशांच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते.

 

या अठवड्यात मिटेल प्रकरण
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन (SCBA) चे अध्यक्ष विकास सिंह म्हणाले की, या आठवड्याच्या अखेरीपर्यंत हे प्रकरण मिटण्याची शक्यता आहे.
- आम्ही रविवारी सरन्यायाधीशांना भेटलो तेव्हा हे प्रकरण मिटले असे वाटले होते. सरन्यायाधीशांनाही हे प्रकरण आठवडाभरात मिटेल आणि सर्वकाही पूर्वीप्रमाणे होईल असे वाटते.
- 4 वरिष्ठ न्यायाधीशांशी चर्चा झाली का असे विचारले असता, आमची चर्चा झाली नाही, पण काही दिवसांत सर्व ठीक होण्याची शक्यता असल्याचे वेणुगोपाल म्हणाले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... सरन्यायाधीशांनी बनवले कॉन्स्टीट्यूशनल बेंच...

 

बातम्या आणखी आहेत...