आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलींच्या बॉम्बस्फाेटात 2 पोलिस अधिकारी जखमी;गडचिराेली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या प्रेशर बॉम्बच्या स्फोटात  सहायक पोलिस निरीक्षक अतुल तावडे आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेश चावर हे दोन अधिकारी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. जखमी अधिकाऱ्यांना उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.   


ही घटना कोरची तालुका मुख्यालयापासून एक किलोमीटर अंतरावरील पकनाभट्टी येथे घडली. नक्षलवाद्यांनी या रस्त्याच्या मध्यभागी एका पुलाजवळ झाडाला बॅनर बांधलेले होते. याबाबत माहिती मिळताच कोरची येथील सहायक पोलिस निरीक्षक अतुल तवाडे व सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेश चावर हे सोमवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले.

 

बॅनर काढत असताना अचानक तेथील प्रेशर बॉम्बचा स्फोट झाला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सुरुवातीला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आल्यावर त्यांना हेलिकॉप्टरने नागपूरला ऑरेंज सिटी रुग्णालयात हलविण्यात आले. दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दोनच दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथील आठवडी बाजारात दुपारी गोंजी मट्टामी या पोलिस जवानावर हल्ला चढवून त्याला जखमी केले होते. साध्या वेशातील नक्षलवाद्यांनी गोंजी मट्टामी यांच्याकडील एके-४७ रायफल हिसकण्याचा प्रयत्नही केला हाेता. मात्र, मट्टामी यांनी प्रतिकार केल्यावर नक्षलवाद्यांनी त्यांच्या दिशेने पिस्तूल रोखली  होती. मात्र, मट्टामी यांनी रायफल हिसकावल्यावर एका नक्षलवाद्याने त्यांच्यावर चाकूहल्ला करून त्यांना जखमी केले होते. या झटापटीत गोंजी मट्टामी यांचे इतर सहकारी तेथे धावून आल्याने नक्षलवाद्यांना तेथून पळ काढावा लागला होता. गोंजी मट्टामी यांच्यावरही उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांत नक्षल्यांकडून पोलिसांवर हल्ले सुरूच आहेत.

बातम्या आणखी आहेत...