आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर इथेच विष घेऊन आत्महत्या करीन...सुनील तटकरेंच्या इशाऱ्याने सभागृह अवाक्

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूगोलाच्या पुस्तकात गुजरातीत छापलेली पाने दाखवताना तटकरे. - Divya Marathi
भूगोलाच्या पुस्तकात गुजरातीत छापलेली पाने दाखवताना तटकरे.

नागपूर- इयत्ता सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात ७ पाने गुजराती भाषेत छापल्यावरून विधान परिषदेत शुक्रवारी गोंधळ झाला. या मुद्द्यावर प्रश्न विचारणाऱ्या सुनील तटकरेंनाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खोटे ठरवण्याचा प्रयत्न केल्याने तटकरेंनी थेट आत्महत्येचाच इशारा दिला. तटकरेंच्या वक्तव्यावर सभागृह अवाक् झाले. गोंधळामुळे परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 


प्रश्नोत्तरांच्या तासानंतर सभागृहात मराठी भाषा समितीचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर तटकरेंनी भूगोलाचे पुस्तक दाखवत महाराष्ट्राचे गुजरातीकरण कधी केले, असा सवाल केला. त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केल्याने कामकाज ३५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. सभागृह सुरू होताच विरोधकांनी पुन्हा गुजराती पानांचा मुद्दा उपस्थित केला. 'असे काहीही घडलेले नाही. पुस्तकात गुजरातीची पाने जोडलेली नाहीत. ही बायंडिंग मिस्टेक असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. तरीही विरोधक आक्रमक झाल्याने पाटील यांनी 'तुम्हीच जाेडून आणली ही पाने', असा आरोप केला. त्यावर 'हे मी छापून आणले हे तुम्ही सिद्ध केले तर इथेच विष घेऊन आत्महत्या करीन', असा इशारा तटकरेंनी दिला. 


एकाच छापखान्यात अनेक भाषांची पुस्तके छापतात. जूनमध्ये हे पुस्तक बाहेर आले. सर्वच पुस्तके गुजरातीत छापली असती तर तटकरेंंनी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात मुद्दा मांडला असता, असे पाटील म्हणाले. सरकारने इतर ठिकाणची पुस्तके तपासून घ्यावीत, असा सल्ला नीलम गोऱ्हेंनी दिला. 


गुजरातच्या बाबतीत लाचार, मुंडेंची टीका 
अहमदाबादच्या श्लोक प्रिंटसिटीकडून १ लाख पुस्तके छापली. सर्व शिक्षा अभियानाचा त्यावर ठप्पा आहे. गुजरातबाबत तुम्हाला किती लाचार व्हायचे ते व्हा, पण महाराष्ट्र होणार नाही. हा अस्मितेचा प्रश्न आहे, असे धनंजय मुंडेंनी ठणकावून सांगितले. दरम्यान, सोमवारपर्यंत चौकशी करून निवेदन करावे, असे निर्देश सभापतींनी दिले. 

 

गुजरातच्या बाबतीत तुम्ही लाचार, मुंडेंची पाटलांवर टीका

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, तुम्ही 1 लाख पुस्तके छापली. श्लोक प्रिंटसिटी, अहमदाबाद यांना छपाईचे काम दिले. सर्व शिक्षा अभियानाचा ठप्पा पुस्तकावर आहे, याकडे लक्ष वेधले. गुजरातच्या बाबतीत तुम्हाला किती लाचार व्हायचे ते व्हा. पण महाराष्ट्र लाचार होणार नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही, असे ठणकावून सांगितले. घडले ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घातक आहे. या गोंधळातच सोमवारपर्यत सर्वंकष चौकशी करून शासनाने निवेदन करावे, असे निर्देश सभापतींनी दिले.

 

अनेक भाषांची पुस्तके एकाच ठिकाणी छापतात
एकाच छापखान्यात अनेक भाषांची पुस्तके छापली जातात. जूनमध्ये हे पुस्तक बाहेर आले. सर्वच पुस्तके गुजरातीत छापली असती तर तटकरे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात हा मुद्दा मांडला असता, असे चंद्रकांतदादा म्हणाले. नीलम गोऱ्हे यांनी सरकारने इतर ठिकाणची पुस्तके तपासून घ्यावी, असे सांगितेले.

 

बातम्या आणखी आहेत...