आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतळ्याची उंची कमी करून छत्रपतींचा अपमान, विरोधक आक्रमक, विधानसभेत पुन्हा गोंधळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत पुन्हा विरोधकांनी शुक्रवारी सरकारला धारेवर धरले. सरदार पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा कमी उंचीचा पुतळा राज्य सरकार उभारत असून सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला. 


यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे जगातील सर्वात उंच स्मारक असेल आणि सर्व गटनेत्यांची बैठक आयोजित करून शिवस्मारकाचा आराखडा दाखवून चर्चा करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या वेळी अध्यक्षांच्या समोरील राजदंड उचलल्याबद्दल अब्दुल सत्तार यांनी सभागृहाची माफी मागितली. अजित पवार यांनी राज्य सरकार गुजरातमध्ये तयार होत असलेल्या सरदार पटेलांच्या स्मारकासाठी शिवस्मारकाची उंची कमी करत असल्याचा आरोप केला. 


जगातील सर्वात उंचच स्मारक असेल : मुख्यमंत्री 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करताना म्हटले, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जगात सगळ्यात उंच असेल. स्मारकाचा पहिला आराखडा केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पाठवला तेव्हा २० टक्के चबुतरा आणि ८० टक्के पुतळा, असे स्कीमॅटिक डिझाइन होते. मात्र, समुद्रातील वारा आणि अन्य बाबींचा विचार करून सल्लागार संस्थेने ४० टक्के चबुतरा आणि ६० टक्के पुतळा असे डिझाइन तयार केले आहे. गटनेत्यांची बैठक घेऊन आराखड्यासंदर्भात चर्चा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

बातम्या आणखी आहेत...