आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनुला श्रेष्ठ अन् तुकोबा, ज्ञानोबा माऊलींना कमी लेखणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करा-विरोधक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शेतातील आंब्यावरून वादाच्या भोवर्‍यात अडकलेले संभाजी भिडे यांनी आणखी वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. भिडे यांनी ज्ञानोबा आणि तुकोबा माऊलींची तुलना थेट मनूसोबत केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी मनुला श्रेष्ठ अन् ज्ञानोबा तुकोबा माऊलीला कमी लेखले आहे. भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले. भिडेंना अटक करा, अशी भागणी अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

 

दुसरीकडे, संभाजी भिडे गुरुजी यांचा विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संभाजी ब्रिगेडने तक्रार दाखल केली आहे. भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

टाळ-मृदुंगाच्या गजरात वारीला निघालेल्या भिडे यांना या वारीतच ज्ञानोबा, तुकोबांपेक्षा मनू एक पाऊल पुढे होता, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यातील राजकारणही चांगलेच तापले आहे.

 

भिडेंची 'ती' व्हिडीओ क्लिप तपासून पाहू- मुख्यमंत्री
संभाजी भिडे यांची व्हिडीओ क्लिप तपासून पाहू. व्हिडीओ असंवैधानिक विधान आढळल्यास कारवाई करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. राज्य सरकार मनूच्या विचाराचे समर्थन करीत नाही. करणार नाही, चालणार नाही, तुकाराम महाराजांच्या बद्दलचे वक्तव्य तपासून पाहिले जाईल, संविधान विरोधी असेल तर कारवाई करू असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

काय म्हणाले संभाजी भिडे...
भिडे यांनी मनुस्मृतीतील काही वचनांचा उल्लेख यावेळी बोलताना केला. भिडे म्हणाले, माणसे पशू बनत आहेत. पण त्यांना पशूपेक्षा वेगळा ठेवतो तो धर्म. कारण पशू धर्माचे आचरण करत नाही. स्वतःला ओळखण्याची शक्ती देवाने मानवाला दिली आहे. धर्माच्या आचरणाच्या माध्यमातून मनावर नियंत्रण मिळवता येते. ज्ञानोबा आणि तुकारामांनी आपल्याचा तो मार्ग दाखवला आहे. पण मनू, हा त्यांच्या पेक्षा एक पाऊल पुढे होता.

 

हेही वाचा, 
भिडेंचे वक्‍तव्‍य सामाजिक व धार्मिक तेढ करणारे, तात्‍काळ गुन्‍हा दाखल करा- संभाजी ब्रिगेड

बातम्या आणखी आहेत...