आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीअरच्या बाटल्या..सरकार शुद्धीवर का नाही, कारण आता उमगले; विखे पाटलांची खोचक टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- विधानभवन परिसरातील पाण्याचा निचरा करणार्‍या नाल्यात दारू, बीअरच्या रिकाम्या बाटल्या तसेच प्लास्टिकच्या पिशव्या सापडल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. सरकार मागील 4 वर्षांपासून शुद्धीवर का नाही, याचे कारण आता उमगल्याचे विखे पाटलांनी म्हटले आहे.

 

विधानभवन परिसरात तुंबलेले पाणी बाहेर काढताना गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या होत्या. त्यावर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले की, विधानभवनात दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडतात, हे सुरक्षा यंत्रणेचे मोठे अपयश आहे.

 

विधानभवनाचा खंडीत झालेला वीज पुरवठा आणि पाणी तुंबल्याच्या प्रकाराबाबत बोलताना विरोधी पक्षनेते म्हणाले की, या सरकारकडे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ नाही. उलटपक्षी त्यांचे ‘मॅनेजमेंट’च एक ‘डिझास्टर’ आहे. म्हणूनच पाऊस आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे विधिमंडळाचे कामकाज बंद करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. भाजप-शिवसेना सरकारने महाराष्ट्राला अगोदरच अंधारात ढकलले आहे. आज विधिमंडळालाही अंधारात ढकलल्याचे दिसून आले. राज्याला तर अगोदरच बुडवले आहे. आता विधानभवनही बुडते की काय, अशी गंभीर परिस्थिती या सरकारने निर्माण करून ठेवल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...