आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप बेईमान निघाला.. रिपब्लिक पक्षाचा संताप; विधान परिषदेत उमेदवारी न दिल्याचा राग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विधान परिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपकडून उमेदवारी पदरात न पडल्याने रिपब्लिकन पक्षाने (आठवले) नाराजी व्यक्त केली. 'भाजप बेईमान निघाला', या शब्दात नेत्यांनी संताप व्यक्त केला.

 

राज्यात भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी रिपाइंला केंद्रात मंत्रिपदासह विधान परिषदेच्या २ जागा आणि सत्तेत १० टक्के वाटा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, साडेतीन चार वर्षे होऊनही भाजपने ते पाळले नाही. विधान परिषदेच्या अकरा जागा रिक्त झाल्यावर रिपाइंला एका तरी जागेवर भाजप संधी देईल, असे वाटत होते. मात्र, तेथेही भाजपने आमची निराशा केली, असे सांगत पक्षाध्यक्ष आठवलेंना याप्रश्नी भेटणार असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे.