आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गल्लो गल्ली चहा विकणारा असा बनला कोट्यधिश DON; जगतो लक्‍झरी लाइफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्याची उपराजधानीत गुन्हे जगताचा डॉन आणि नागपूर पोलिसांसाठी मोस्ट वॉंटेड ठरलेला कुख्यात संतोष आंबेकर याने अखेर प्रथम श्रेणी न्यायालयापुढे आत्मसमर्पण केले. कुख्यात गुंड बाल्या गावंडे खून प्रकरणात आरोपी असलेला आंबेकर हा मागील दोन वर्षांपासून फरार होता. त्यामुळे नागपूर पोलिस टीकेचे लक्ष्य बनले होते. खून, दरोडा, खंडणीचे असंख्य गुन्हे दाखल असलेला संतोष आंबेकर दोन वर्षापूर्वी नागपुरात घडलेल्या बाल्या गावंडे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार होता. 


दोन वर्षांपूर्वी संतोष आंबेकरची त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. तुरुंगाबाहेर त्यांचे समर्थकांनी जोरदार स्वागत केले. काही दिवस फरार राहिल्यानंतर आंबेकर मार्च महिन्यात सोनेगाव पोलिस स्टेशनमध्ये शरण आला होता. त्याच्यासह टोळीतील सद्स्यांवर मोक्‍का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायदा) नुसार कारवाई करण्यात आली होती.

 

समर्थक खूश तर पोलिस नाराज...

- डॉन आंबेकर तुरुंगाबाहेर आल्याने त्याचे समर्थक खुश तर पोलिस मात्र नाराज दिसले.
- मंगळवारी त्याच्या स्वागतासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
- आंबेकरची रियल लाइफ एखाद्या फिल्मी डॉनसारखीच ग्लॅमरस आहे.

कधी चहा विकणारा आंबेकर कसा झाला गर्भश्रीमंत. जाणून घ्‍या डॉनचा पूर्ण कहाणी...
- संतोष आंबेकर हा नागपूरमधील सर्वात मोठा डॉन आहे.
- कधीकाळी नागपूरच्‍या इतवारी परिसरात त्‍याची चहाची टपरी होती.
- आंबेकर आणि त्‍याच्‍या गँगवर महाराष्ट्र सरकारने 'मोक्का' लावला आहे.
- त्‍याच्‍यावर खून, खंडणी, गँगवारसह अनेक गंभीर गुन्‍हे दाखल आहेत.
- पोलिसांच्‍या माहितीनुसार, आंबेकर हा नागपूरमधील सर्वात श्रीमंत डॉन आहे.
- त्‍याच्‍या बंगल्‍याची किंमत 4 कोटी रुपये आहे.
- मोक्का लागल्‍यापासून तो फरार आहे. मोठ-मोठ्या राजकारण्‍यासोबत त्‍याची चांगली ओळख आहे.

 

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, वॉण्‍टेड असताना भाजप आमदाराच्‍या रॅलीत.... बिल्डरला मागितली होती खंडणी....अरुण गवळीची घेतली होती भेट....डॉनने जाळली होती नवी कोरी कार....

बातम्या आणखी आहेत...