आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नीची तिरुपती देवस्थान मंडळावर दोन वर्षांसाठी नियुक्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना यांची आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळावर दोन वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे. अलिकडेच आंध्र प्रदेशातील सत्तारूढ तेलुगु देशम पार्टीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती विशेष चर्चेत आहे.

 

आंध्र प्रदेशच्या महसूल विभागाने गेल्याच आठवड्यात अधिसूचना काढून तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळावरील 18 नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांची महाराष्ट्राच्या प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्रातील शिर्डी आणि सिद्धीविनायक या देवस्थानांवर देखील याच पद्धतीने आंध्र प्रदेश सरकारकडून प्रतिनिधी नियुक्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंध्र प्रदेशातील सत्तारूढ तेलुगु देशम पार्टीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही सपना मुनगंटीवार यांची नियुक्ती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. तिरूमला तिरुपती देवस्थान मंडळावरील या सर्व नियुक्त्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी मंजूर केल्या आहेत, हे विशेष. मुनगंटीवार कुटुंब नियमितपणे तिरुपतीला दर्शनासाठी जात असते.

बातम्या आणखी आहेत...