आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर...मराठवाडा, विदर्भासाठी राज्य सरकारचे पॅकेज, रोजगार, कृषी आणि पर्यटनावर भर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्य सरकार गुरुवारी (ता.19) मराठवाडा आणि विदर्भासाठी आणखी एक पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. हे पॅकेजमध्ये कृषीसह रोजगार, पर्यटन क्षेत्रावर भर राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांसह शेतमजूर तसेच सामान्यांचाही प्रामुख्याने विचार करण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

 

या पॅकेजमध्ये पर्यटनस्थळांचा विकास करून त्यातून रोजगार निर्मिती करण्याच्या योजनांवर भर राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मराठवाड्यातील वेरूळ, अजिंठा तसेच विदर्भातील कौंडीण्यपूर, रामटेक, खिंडसी आदी पर्यटनस्थळांचा समावेश होऊ शकतो. तसेच मराठवाडा व विदर्भातील कृषी पर्यटनावर भर दिला जाईल. या विभागांत अनेक ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग पर्यटनस्थळेही स्थळेही आहेत. त्यांचा विकास करून रोजगार निर्मितीवर पॅकेजचा भर असेल.

 

37 वर्षांत 5 वेळा कर्जमाफी:
1980 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी प्रथमच राज्यातील शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ केले होते. तेव्हापासून 37 वर्षात 5 वेळा कर्जमाफी देण्यात आली.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली.
- 2008-09 मध्ये यूपीए सरकारने 3 कोटी शेतकऱ्यांना 71 हजार कोटींची कर्जमाफी दिली. यात राज्यातील 42 लाख शेतकरी लाभार्थी होते. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 17 हजार कोटींची तरतूद केली होती.

बातम्या आणखी आहेत...