आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर पाण्यात...निम्म्या शहरात गुढघाभर पाणी, गोंदियात प्रसूतीगृहात घुसले पाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शहरासह परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. संततधार पावसामुळे अनेक रस्ते गेले पाण्याखाली गेले आहेत. या पावसाचा फटका विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बसला आहे. विधान भवन परिसात पाणी तुंबले आहे. वीज पुरवठा खंडीत झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्‍यात आले आहे. विधानपरिषदेचे कामकाज स्थगितीची घोषणा ते सभागृह सुरू झाल्यावर म्हणजे बारा वाजता होईल.

 

निम्म्या शहरात गुढघाभर पाणी..

निम्म्या शहरात गुढघाभर पाणी साचले आहे. सोनेगाव, कन्नमवार नगरमध्ये  बहुतांश घरात पाणी शिरले आहे. एवढेच नाही तर मंतत्र्यांच्या बंगल्याबाहेर पाणी साचले आहे. अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नागपूरमध्ये मुंबईसारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या तळघराची पाहणी केली. दुसरीकडे हवामान विभागाचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तसेच इंटरनेट ही बंद आहे.

 

प्रसूतीगृहात घुसले पाणी...
गोंदिया येथील बाई गंगाबाई शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती वार्डात अतिवृष्टीमुळे पाणी शिरले आहे.

 

'विधान भवनातील वीजपुरवठा काही तांत्रिक कारणास्तव तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून एक तासासाठी बंद करण्यात आला होता. आता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.'
- ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून फोटो आणि व्हिडिओ...नागपूर पाण्यात...निम्म्या शहरात गुढघाभर पाणी, गोंदियात प्रसूतीगृहात घुसले पाणी  

 

 

बातम्या आणखी आहेत...