आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या जंगलात घ्या वाघोबाचे दर्शन, फोटोंमधून पाहा ताडोबा नॅशनल पार्कमधील सौंदर्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- निळ्याशार जलाशयाभोवती हिरव्‍यागार जंगलात हुंदळणारे वन्‍यजीव, पायाखाली जाणवणारी पानगळ, विविध पक्षांचा किलबील नि मध्‍येच शांत होणारं जंगल, वाघोबांना पाहण्‍यासाठी जमलेले पर्यटक म्‍हणजे ताडोबाचे जंगल. विविध पक्षी, वन्‍यप्राणी, वनस्‍पतींनी भरलेले जैवविविधतेचे भांडार असलेला ताडोबा-अंधारी प्रकल्प म्हणजे भूतलावरचा स्वर्गच.

चला तर मग पाहुया चंद्रपूर जिल्‍ह्यातील ताडोबा नॅशनल पार्कमधील सौंदर्य..

 

राज्‍यातील पहिले राष्‍ट्रीय उद्यान..
- ताडोबा, 31 मार्च 1955 रोजी घोषित झालेले महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे.
- येथील स्थानिक आदिवासींचा देव तारू या नावावरून अभयारण्याला ताडोबा नाव प्राप्त झाले.
- अंधारी वन्यजीव अभयारण्याला येथील अंधारी नदीवरून नाव देण्यात आले आहे.
- ताडोबा, अंधारी संरक्षित क्षेत्रात वाघांसाठी उत्कृष्ट अधिवास, खाद्य व पाणी आहे.
- वाघांची संख्या लक्षात घेऊन 23 फेब्रुवारी 1995 ला या व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली.

 

वाघांसाठी उत्कृष्ट अधिवास..
- ताडोबा अंधारी प्रकल्प वाघांचे साम्राज्य असलेली भूमी आहे.
- येथे वाघांचे खाद्य असलेले वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत.
- जागोजागी लहान मोठे नैसर्गिक जलाशय व पानवठे येथे आहेत.
- ताडोबा म्‍हणजे निव्वळ वाघांचे जंगल नाही येथे सस्तन प्राण्यांच्या 41 जाती आहेत.
- पक्ष्यांच्या सुमारे 290 प्रजातींची या जंगलात नोंद आहे.
- सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 30 जाती, अष्टपाद प्राण्यांच्या 35 जाती येथे आहेत.
- तब्‍बल 75 प्रकारचे रंगेबिरंगी फुलपाखरे येथे आहेत.
- सुमारे 20 प्रकारचे मासे असलेले हे जंगल विविध प्रजातींच्या वनस्पतींनी संपन्न आहे.

 

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अशी आहे समृद्ध वनसृष्‍टी, या प्राण्‍यांचे होईल जंगलात दर्शन, कसे जावे अभयारण्‍यात..