Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Union Minister Nitin Gadkar says First Agro Convention Centre in nagpur

देशातील पहिले कृषी कन्व्हेंशन सेंटर नागपुरात; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

प्रतिनिधी | Update - Jul 28, 2018, 10:05 PM IST

देशातील पहिले कृषी कन्व्हेंशन सेंटर नागपुरात उभारले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नाग

  • Union Minister Nitin Gadkar says First Agro Convention Centre in nagpur

    नागपूर- देशातील शेतकऱ्यांना वर्षभर स्थायी स्वरूपात शेतीचे नवे तंत्रज्ञान, वेगळे प्रयोग यांची माहिती उपलब्ध करता येण्यासाठी देशातील पहिले कृषी कन्व्हेंशन सेंटर नागपुरात उभारले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरात पत्रकार परिषदेत दिली.

    अमरावती मार्गावर या कृषी कन्व्हेंशन सेंटरची उभारणी करण्यात येणार असून त्याची योजना तयार होत आहे. खासगी आणि सरकारी भागीदारीतून सुमारे 44 एकर जागेत हे सेंटर उभारले जाणार आहे. या सेंटरमधून वर्षभर शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. शेतीतील नवे तंत्रज्ञान, नवे प्रयोग प्रत्यक्ष शेतकऱ्यांना सेंटरच्या परिसरात शेतीच्या माध्यमातून दाखवण्याची व्यवस्था येथे राहणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. नागपुरात दरवर्षी आयोजित होणारी राष्ट्रीय अॅग्रोव्हिजन प्रदर्शन यंदा 23 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत होणार असून या प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

    प्रदर्शनाचे हे दहावे वर्ष असून यात शेतीशी संबंधित चारशेवर कंपन्या सहभागी होणार आहेत. कृषी प्रदर्शनासोबतच पशुपालन, दुग्धविकास यावर माहिती देणारी पशु प्रदर्शनही राहणार आहे. या प्रदर्शनासोबतच कापूस उत्पादन, जैविक शेती, रेशीम उत्पादन, सूक्ष्म सिंचन, निसर्ग शेती हरितगृह, फुल शेती, संत्रा प्रक्रिया, मत्स्यपालन, दुग्ध विकास यासह 24 विषयावर शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आणि एकदिवसीय परिषदा आयोजित होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

Trending