आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगाने राहुल गांधींनाही ‘अच्छे दिन’; योगगुरू बाबा रामदेव यांचे मिश्कील वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आई नियमितपणे योगा करते. आजी आणि पणजोबादेखील योगा करायचे. संपूर्ण गांधी परिवारच योग करायचा. राहुल गांधी जिममध्ये जाण्यासोबतच योगाही करतात. त्यामुळे त्यांना “अच्छे दिन’ येऊ शकतात, असे मिश्कील प्रतिपादन योगगुरू बाबा रामदेव यांनी चंद्रपूर येथे बोलताना केले. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात  मंगळवार (दि.२०) पासून बाबा रामदेव यांचे त्रिदिवसीय योग शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी बाबा रामदेव चंद्रपूरमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  

  
मोदी सरकारने देशातला अंतर्गत काळा पैसा बाहेर काढण्यासाठी अनेक पावले उचलली. पण नीरव मोदीसारख्यांनी केलेल्या घोटाळ्यामुळे त्या प्रयत्नांना खीळ बसते. “एक मोदी बँकांमध्ये पैसे जमा करतात आणि दुसरा मोदी पैसा घेऊन पळून जाताे,’ अशी खंत बाबा रामदेव यांनी व्यक्त केली. 
 

अण्णा हजारेंचे वय झाले   
अण्णा हजारे यांचे आता वय झाले आहे. काही राजकीय व्यक्ती त्यांचा फायदा घेऊ शकतात. अण्णांनी याबाबत सावध राहायला हवे. हजारे यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत काही बदल केल्यास त्यांना नक्कीच समर्थन देऊ, असे बाबा रामदेव म्हणाले. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मध संकलनाबाबत आम्ही सर्वेक्षण करत आहोत. लवकरच त्याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करू तसेच या परिसरातील वनौषधीबाबतही निश्चितपणे विचार करू, असे ते म्हणाले. आरोग्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्हा सर्वोत्तम राहावा म्हणून योग शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...