आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 लाख घेऊन 'पायलट'ची नोकरी लावून देण्याचे आमिष, राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरातील एका ३० वर्षीय युवकाला एका विमान कंपनीत पायलट पदाची नोकरी लावून देण्यासाठी तब्बल २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप युवकाच्या वडिलांनी पोलिस तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे माजी पदाधिकारी प्रल्हाद सुंदरकरविरुद्ध मंगळवार, २७ फेब्रुवारीला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकाराने शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

 

शहरातील साई नगरमध्ये राहणाऱ्या रमेश अजाबराव खोरगडे (६०) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. रमेश खोरगडे यांचा मुलगा विनय यांनी २०१० - ११ मध्ये पायलटचे प्रशिक्षण घेतले. दरम्यान, २०१३ मध्ये मुंबईला एका कंपनीत पायलट पदाच्या जागा निघाल्या होत्या. त्यामुळे पायलटच्या नोकरीसाठी विनय यांनी अर्ज केला होता. २१ जुलै २०१३ ला विनय यांची लेखी परीक्षा होती. तत्पूर्वी, रमेश खोरगडे यांच्या कार्यालयातील प्रभाकर चांदेकर या व्यक्तीने त्यांना सांगितले की, तुमच्या मुलाचे नोकरीचे काम प्रल्हाद सुंदरकर हेच करू शकतात. त्यामुळे रमेश खोरगडे, त्यांचा मुलगा विनय, प्रभाकर चांदेकर व नागाेराव कोठे हे चौघे सुंदरकरच्या घरी येऊन त्यांना भेटले. त्यावेळी सुंदरकर म्हणाले की, पायलटच्या नोकरीसाठी ५० लाख रुपये लागतील.

 

बातम्या आणखी आहेत...