आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवादी ठरवत पोलिसांनी आदिवासी तरुणाला ठार केले; रेकनार येथील गावकऱ्यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- गडचिरोली जिल्ह्यातील रेकनार येथील ३० वर्षीय आदिवासी तरुणाला गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकाने नक्षलवादी ठरवून ठार मारल्याचा आरोप गावकऱ्यांनी केल्याने खळबळ उडाली असून गडचिरोली पोलिसांची ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पोलिस मात्र या कारवाईबाबत ठाम असून या प्रकरणातील अहवाल मागवण्यात आल्याची माहिती नक्षल विरोधी अभियानाचे महानिरीक्षक शरद शेलार यांनी दिव्य मराठी शी बोलताना दिली. 


एटापल्ली तालुक्यातील रेकनार येथील सोनसू उसेंडी हा तीस वर्षीय आदिवासी तरुण ३० मार्च रोजी गावालगतच्या जंगलात पक्ष्यांची शिकार करण्यासाठी गेला होता, असा गावकऱ्यांचा दावा आहे. रात्रीपर्यंत तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांना गावकऱ्यांना सोबत घेऊन त्याचा शोध सुरू केला. ३१ मार्च रोजी सोनसू हा पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. सोनसू हा नक्षलवादी असल्याने पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला. मात्र, सोनसूचा नक्षलवादाशी संबंध नव्हता, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 

 

साेनसू नक्षलवादीच : पोलिस महानिरीक्षक
महानिरीक्षक शरद शेलार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले. सोनसू उसेंडी हा नक्षलवादीच होता असा दावा करत गडचिरोली पोलिसांकडून या कारवाईचा तसेच सोनसूबाबतचा संपूर्ण अहवाल मागवण्यात आल्याची माहिती शेलार यांनी दिली. सोनसू याच्यावर यापूर्वीचे काही गुन्हेही दाखल असण्याची शक्यता असल्याचे ते   या वेळी म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...