आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचन घोटाळा : प्रगती अहवाल ८ दिवसांत द्या; नागपूर खंडपीठाचे सरकारला आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सिंचन घोटाळ्याच्या तपासावर नाराजी व्यक्त करतानाच अमरावती आणि नागपूर विभागातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष तपास पथकांच्या तपासात काय प्रगती आहे, याबाबतचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने गुरुवारी सरकारला दिले. 


मागील सुनावणीत खंडपीठाने विशेष तपास पथकांच्या तपासाच्या प्रगतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच तपासावर निगराणी ठेवण्यासाठी दोन सेवानिवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्याचे संकेतही दिले होते. त्यानुसार या कामी गुरुवारी सेवानिवृत्त न्या जे. एन. पटेल व न्या आर. सी. चव्हाण यांची नावे सुचविण्यात आली. घोटाळ्याच्या चौकशीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक स्वत: लक्ष घालून असल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली. चौकशीचा अहवाल सादर करण्यासाठी दोन आठवड्याचा वेळ देण्यात यावा तसेच अहवाल समाधानकारक न वाटल्यास एसआयटीच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी दोन सेवानिवृत्त न्यायमूर्तींची समिती स्थापन करण्यात यावी. तोवर समिती स्थापन करण्याचा मुद्दा मागे ठेवण्यात यावा, अशी विनंती सरकारच्या वतीने करण्यात आली. ती खंडपीठाने ती अमान्य केली. 

बातम्या आणखी आहेत...