आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगाव हत्या प्रकरणात शिवसेनेच्या माजी अामदाराचा पाेलिसांवर दबाव: धनंजय मुंडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> राष्ट्रवादीचा विधान परिषदेत गाैप्यस्फाेट; एसपींचे पत्रच धनंजय मुंडेंनी मांडले 

> पत्र लिक झालेच कसे? शिवसेनेचा सवाल, दाेन्ही बाजूंनी गदाराेळ 

 

नागपूर- शिवसेनेचे कार्यकर्ते संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या केडगावातील हत्येप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिस यंत्रणेवर शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड दबाव टाकत अाहेत. याबाबतचे पत्र नगरच्या स्वत: पोलिस अधीक्षकांनी पोलिस महासंचालकांना दिल्याचा गाैप्यस्फाेट करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत हे पत्रच सादर केले. तर पोलिस तपासातील हे गोपनीय पत्र लिक करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते अनिल परब यांनी केली. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांत खडाजंगी सुरू झाली. हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी परब यांनी केली, तर अामच्या अामदारांना विनाकारण यात गाेवले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. 


महापालिकेच्या पोटनिवडणुकीत 8 एप्रिल रोजी केडगावात भरदिवसाकोतकर आणि ठुबे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजप आमदार शिवाजी कार्डिले यांना अटक करण्यात आली होती. परंतु, या प्रकरणातील पीडितांच्या कुटुंबीयांना संरक्षण मिळावे आणि नगर पोलिस अधीक्षकांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी केली. त्यावर शिवसेनेचेच माजी आमदार राढोड पोलिसांवर दबाव आणत आहेत, अशा आशयाची तक्रार पोलिसांकडे केली आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांत चांगलीच खडाजंगी झाली. गोपनीय पत्र अशाप्रकारे उघड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी शिवसेनेने केली.


गरज वाटल्यास पुरवणी आरोपपत्र : मुख्यमंत्री 
या प्रकरणातील पीडित कुटुंबास संरक्षण देण्यात येईल. तसेच या खटल्याच्या सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकाही दाेषीला सरकार साेडणार नाही. तपासात गरज वाटल्यास, पुरवणी आरोपपत्रही दाखल करण्यात येईल. या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्या पोलिस उपअधीक्षकांची चौकशी करू. ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. 

बातम्या आणखी आहेत...