आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाचा घरी येऊन विवाहितेवर बलात्कार, आक्षेपार्ह फोटो काढून जीवे मारण्याची दिली धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- लग्नसंभारंभात ओळख झालेल्या एका नात्यातील युवकाने घरात घुसून विवाहितेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. युवक दिड वर्षापासून विवाहितेवर अत्याचार करत होता आणि तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावरुन मागत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून अमोल बबनराव वाईनदेशकर (32, रा. नारायणपूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

 

पीडित विवाहीता ही  25 जानेवारी 2017 ला  एका लग्न समारंभासाठी नारायणपूरला गेली होती. त्याचठिकाणी तीची ओळख अमोलसोबत झाली होती. त्यानंतर या दोघांची मैत्री झाली. यामधून अनेकदा अमोल या विवाहितेच्या घरी अमरावतीला येत होता. त्यानंतर त्याने विवाहितेच्या घरीच तिचा पती घरात नसल्याची संधी साधून अत्याचार केला. याच दरम्यान अनेकदा तिचे आक्षेपार्ह छायाचित्र त्याने सोशल मिडयाव्दारे मागितले. त्यावेळी तिने त्याला छायाचित्र पाठवले.

 

दरम्यान त्यानंतर त्याने आपण लग्न करू, असेही आश्वासन दिले. मात्र काही दिवसानंतर अमोलने जीवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नाही तर आपला संसार उध्वस्त होईल, या भितीने पीडितेने सदर बाब तिच्या पतीलासुध्दा सांगितली नाही. मात्र अमोलचा त्रास वाढल्यामुळे तिने ही बाब पतीला सांगितली व शनिवारी रात्री फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अमोल वाईनदेशकर विरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...