आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीपर्यंत मराठी सक्तीसाठी प्रयत्न; नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘मी पिंडाने लेखक, काम केले सनदी अधिकारी म्हणून प्रशासन क्षेत्रात, पण मी मनाने कार्यकर्ता आहे. त्यामुळे  मी आगामी काळात ‘कार्यकर्ता अध्यक्ष’ म्हणूनच काम करणार आहे. तसेच सर्वच माध्यमातील बारावीपर्यंतच्या शिक्षणात मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी सरकारचे पाठपुरावा करणार अाहे,’ असे मनोगत अखिल भारतीय मराठी साहित्य  संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी रविवारी व्यक्त केले. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वामुळे  पुरोगामी बनलेल्या  बडोदा येथील संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्याचा  विशेष आनंद वाटतो. बृहन्महाराष्ट्रातील  मराठी भाषेसंदर्भात ठोस काम करण्याचा माझा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.  

 

रविवारी दुपारी तीनच्या सुमारास देशमुख  हे अध्यक्षपदी निवडून आल्याचा  दूरध्वनी आला आणि अभिनंदन, शुभेच्छांच्या  वर्षावात देशमुख  यांचे पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील निवासस्थान न्हावून निघाले. माध्यमाच्या  प्रतिनिधींची गर्दी वाढू लागली. कुटुंबीयांनी  पेढा भरवून देशमुख  यांचे  अभिनंदन केले.  


बडोदे येथे फेब्रुवारी महिन्यात संमेलन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देशमुख  यांनी बृहन्महाराष्ट्रातील  मराठी भाषेविषयी चिंता व्यक्त केली. ‘मराठी भाषेची अवस्था गंभीर आहे. नव्या पिढीला मराठी चांगली बोलता येत नाही, लिहिणे तर दूरच. मराठी भाषा शिकवणाऱ्या  शिक्षकांनाही भाषा किती येते, हे प्रश्नचिन्ह आहे. मराठी आता सर्व माध्यमांमध्ये शिकणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी इयत्ता बारावीपर्यंत  अनिवार्य केली पाहिजे, असे माझे मत आहे आणि मी वर्षभर यासाठी प्रयत्न करणार आहे. शेजारच्या  राज्यांत मराठी भाषेसाठी पोषक वातावरण नाही. केवळ कर्नाटकमध्येच  मराठीची गळचेपी होते असे नाही. गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश आदी शेजारी राज्यांतही ती सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने यासाठी  ठोस भूमिकाघेणे गरजेचे आहे’, असे देशमुख म्हणाले.

 

पुण्याच्या घरी अानंदाेत्सव 

बडोदे येथे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या  मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  प्रसिद्ध लेखक, माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची रविवारी निवड झाली. या निवडीचा पुण्यातील त्यांच्या घरी अानंदाेत्सव साजरा करण्यात अाला. कुटुंबीयांनी देशमुख यांचे  पेढा भरवून अभिनंदन केले. या वेळी अंजली कुलकर्णी, निखिल देशमुख, रामचंद्र भोंडवे, भारती भोंडवे, मंदाकिनी टेळकीकर अादी उपस्थित होते. दिवसभर देशमुखांच्या घरी शुभेच्छांचा वर्षाव सुरूच हाेता.

 

बृहन्महाराष्ट्र मराठी विभाग हवा 
राज्याच्या  आसपासच्या राज्यात मराठी भाषेचा प्रसार - प्रचार व्हावा, भाषेचे जतन व संवर्धन व्हावे, यासाठी  राज्य शासनाने बृहन्महाराष्ट्र  मराठी विभाग स्थापन करावा. त्यावर प्रशासकीय अधिकारी नेमावा. दर तीन महिन्यांनी या विभागांची बैठक घेऊन मराठी भाषा, संस्कृती, साहित्य यासंदर्भातील समस्यांची चर्ची व्हावी व उपायांची अमंलबजावणी व्हावी, अशी मागणी लक्ष्मीकांत देशमुख यांनी केली.

 

देशमुख उवाच..
-  अभिव्यक्तीच्या गळचेपीविरोधात  लेखकांनी आवाज उठवला पाहिजे
-  मी स्वखर्चाने संमेलनाला जाणार 
-  प्रत्येक तालुक्यात मराठी पुस्तक विक्री केंद्र उभारावे 
-  महामंडळ आणि शासन यांच्यात दुवा बनून काम करणार

 

हे ही वाचा, 
मराठवाड्याचे ‘कौतिक’! साहित्‍य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख
डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख साहित्य संमेलनाध्यक्ष; मराठवाड्याच्या साहित्यिकाला सन्मान

 

पुढील स्‍लाइडवा वाचा, अल्पपरिचय... आदर्श जिल्हाधिकारी ते संमेलनाध्यक्ष...

बातम्या आणखी आहेत...