आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता 'शिवाजी थॉट्स अॅण्ड मॅनेजमेंट'चे धडे; आगामी बैठकीत निर्णय होणार असल्याचे संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरीत्रावर अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. या अनुषंगाने विद्यापीठाच्या विकास विभागाकडून 'शिवाजी थॉट्स अॅण्ड मॅनेजमेंट' हा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. व्यवस्थापन परिषदेच्या आगामी बैठकीत या विषयावर शिक्कामाेर्तब   होणार असल्याचे संकेत आहे. 


छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आहे. कुशल संघटन कौशल्यामुळे स्वराज्याची मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली. चातुर्य आणि उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्यामुळे स्वराज्य त्यांना टिकवून देखील ठेवता आले. ऐवढेच नव्हे तर सर्वधर्म समभाव, महिलांचा आदर, धर्म, आध्यात्म यासह विविध क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अनुकरणीय आहे. त्यांचे विचार तसेच व्यवस्थापन कौशल्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. विद्यापीठाच्या सर्वसाधारण निधीतून विविध अभ्यासक्रम सुरू करता यावे म्हणून १५ फेब्रुवारी १९९६ रोजी निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या आधारे यापूर्वी देखील पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग, पदव्युत्तर इतिहास विभाग, पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग, पदव्युत्तर वाणिज्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा पदव्युत्तर शैक्षणिक विभाग असे विविध अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या संशोधन करता यावे म्हणून अश्या प्रकारच्या अभ्यासक्रमांची नितांत आवश्यकता असते. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम ५(७) आणि (८) तसेच कलम ३१(डी) मध्ये देखील अश्या प्रकारची तरतूद करण्यात आली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत या विषयावर निर्णय होणार असल्याचे संकेत आहे. 


शिवसेनेचे होते निवेदन 
शिवसेनेचे उपशहर प्रमुख अमोल निस्ताने यांच्याकडून 'शिवाजी थॉट्स अॅण्ड मॅनेजमेंट' हा अभ्यासक्रम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सुरू करण्याची मागणी केली. याबाबत १९ एप्रिल २०१८ मध्ये निवेदन देण्यात आले होते. 

बातम्या आणखी आहेत...