आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडअळीवरील ‘लक्षवेधी’वर सरकारकडून उत्तरच न आल्याने विरोधक झाले आक्रमक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर-  कापसावरील बोंडअळीच्या समस्येवरील लक्षवेधी सूचना बुधवारी विधानसभेत गाजली. या लक्षवेधी सूचनेवर राज्य सरकारकडून उत्तरच न आल्याने विधानसभेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. या लक्षवेधीवर गुरुवारी उत्तर दिले जाणार आहे.


विदर्भ, मराठवाडा, खान्देशात मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान, मान्यता नसलेले हर्बीसाइड टॉलरंट जीन्स असल्याचे बियाणे आढळून येण्याचा विषय लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विधानसभेत मांडण्यात आला होता. लक्षवेधी सूचना चर्चेला आली त्या वेळी कृषिमंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. मंत्र्यांना माहिती घ्यायची असल्याचे स्पष्टीकरण अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या वेळी दिले. त्यावर संतापलेल्या विरोधकांनी हा गंभीर प्रकार असल्याचे सांगत मंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली. बोंडअळीच्या प्रश्नावर सरकारकडे उत्तरच नाही काय, असा प्रश्न अजित पवार यांनी केला. विदर्भातील काही आमदारांनी अध्यक्षांच्या आसनापुढे ठाण मांडून आताच उत्तर यावे, अशी जोरदार मागणी केली. त्यामुळे गोंधळ वाढल्याने कामकाज तहकूब झाले. 

 

विधान परिषदेतही पडसाद : तटकरे-पाटील यांच्यात खडाजंगी

विधान परिषदेत बुधवारी बाेंडअळी व शेतकरी प्रश्नाचे तीव्र पडसाद उमटले. याविषयी स्थगन प्रस्तावावर (२८९ अन्वये) बोलण्याची मागणी विराेधकांनी केली. मात्र सत्ताधारी सदस्यांकडून त्याला अाक्षेप घेण्यात अाला. दाेन्ही बाजूंचे सदस्य अाक्रमक झाल्यामुळे सभागृहात गाेंधळ वाढला व सभापतींना कामकाज तहकूब करावे लागले. पुन्हा कामकाज सुरू हाेताच या विषयावर स्थगत प्रस्ताव कसा काय हाेऊ शकताे, हे सांगण्याची परवानगी उपसभापतींनी सुनील तटकरे यांना दिली. सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी त्याला जाेरदार हरकत घेतली. मात्र उपसभापतींनी ती नाकारली. त्यामुळे पुन्हा सत्ताधारी व विराेधी बाकावरून गाेंधळ सुरू झाला. शेतकऱ्यांविषयी चर्चा राेखणारे चंद्रकांत पाटील हे शेतकरीद्राेही अाहेत, असा अाराेप तटकरे यांनी केला.  मात्र विराेधक संख्याबळाच्या जाेरावर सत्ताधाऱ्यांची परिषदेत मुस्कटदाबी करत असल्याचा अाराेप पाटील यांनी केला. त्यामुळे या दाेघांमध्ये शाब्दिक वाद वाढत गेला. ]

 

पीक विम्यात बाेंडअळीचा समावेश करा : अजित पवार

पीक विमा म्हणजे पैसे जमा करण्याचे साधन झाले आहे. शेतकऱ्यांना मात्र फायदा होत नाही. पीक विम्यात बोंडअळीचा समावेश केला पाहिजे. पिकांना हमीभाव दिला तरच शेतकरी टिकेल. सरकारने या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.

 

सरकारकडून अद्याप माहिती कशी घेतली गेली नाही : विखे
राज्यातील बहुतांश भागात कापसाच्या पिकावर बाेंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती अालेल्या काेट‌्यवधी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले अाहे. खरे तर सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अाहे. अामदारांकडून अशा गंभीर विषयांवर लक्षवेधी सूचना फार पूर्वी दिल्या जातात. मात्र सभागृहात त्याचे उत्तर देण्यासाठी सरकारकडून माहिती कशी घेतली गेली नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी उपस्थित केला.

 

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत ताेपर्यंत कामकाज नाही : मुंडे
सत्ताधारी पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न विधिमंडळात मांडू देत नसेल तर अाम्ही प्रश्न कुठे मांडायचे?  मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमाेर अनेक प्रश्न अाहेत. त्यावर सरकारने तातडीने निर्णय करावा, ही मागणीही अाम्हाला मांडू दिली जात नाही.  मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांच्या बाबतीत  हे सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारला दिला.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा...विखे पाटील म्हणाले... युती सरकार ‘बोंडअळी’, तर मी ‘विषारी औषध’

बातम्या आणखी आहेत...