आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मैत्रेय'च्या व्यवस्थापकासह सहाय्यक व्यवस्थापकास अटक; गुंतवणूकदारांची रक्कम भरणा केल्याचा ठपका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मैत्रेय अमरावतीचा शाखा व्यवस्थापक तसेच सहायक शाखा व्यवस्थाकाविरुद्ध मार्च २०१६ मध्ये गुन्हा दाखल होता. त्यानंतर दोघांनांही तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने त्यांचा तात्पुरता जामीन रद्द केल्याने आर्थिक गुन्हे शाखेने दोघांनाही अटक केली होती. दरम्यान, सोमवारी त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. 


व्यवस्थापक प्रमोद वासुदेवराव डाखोरे (३०, रा. चंद्रपूर) आणि सहायक व्यवस्थापक हर्षल प्रदिपराव पाटील (२७, रा. कमल कॉलनी, अमरावती) असे अटक झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही २००९ पासून अमरावती शाखेत कार्यरत होते. मेत्रेयमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना शाखेत रकमेचा भरणा करावा लागत होता. त्यावेळी व्यवस्थापक व सहायक व्यवस्थापकाच्या माध्यमातूनच या रकमेचा भरणा केला जायचा. या ठिकाणी गुंतवणूकदारांनी भरणा केलेली रक्कम मुंबईच्या मुख्य कार्यालयात पाठवण्यात येत होती. 


दरम्यान, मैत्रेयमध्ये हजारो ग्राहकांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत केली नाही किंवा भुखंड देण्याचे आमिष देणाऱ्यांना भुखंडही दिले नाहीत. त्यामुळेच मार्च २०१६ मध्ये शहर कोतवाली पोलिस ठाण्यात मैत्रयेच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. सदर तपास आर्थीक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल२ा होता. तपासादरम्यान या दोघांविरुद्धही गुन्हे दाखल झाले होते. मात्र त्यांना तात्पुरता जामिन मिळाला होता. त्यामुळे पोलिस त्यांना अटक करू शकले नव्हते. काही दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामिन रद्द केला होता. दरम्यान, ही बाब आर्थिक गुन्हे शाखेला माहीत झाल्यानंतर त्या दोघांनाही शनिवारी अटक करण्यात आली होती. त्यांना २५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली. 


४० हजार ८३८ तक्रारदार, ७४ कोटींची फसवणूक

मैत्रेयमध्ये गुन्हा दाखल होवून दोन वर्षे झाले आहे. मात्र अजूनही तक्रारदार पोलिसांकडे तक्रारी घेवून येत आहेत. सद्यास्थितीत फसवणूक झालेल्या ग्राहकांची संख्या ४० हजार ८३८ झाली आहे. तसेच ७४ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात मैत्रेयच्या मुख्य संचालिका वर्षा सत्पाळकर वगळता इतरांना अटक झालेली आहे. 


दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी 
न्यायालयाने पाटील व डाखोरे यांना तात्पुरता जामिन दिला होता. मात्र आता न्यायालयाने त्यांचा जामिन रद्द केल्यामुळे दोघानांही अटक केली होती. सोमवारी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. 
- पंजाबराव वंजारी, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा. 

बातम्या आणखी आहेत...