आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Nagpur: सापाशी खेळणे पडले महागात, युवक गंभीर अवस्‍थेत रुग्‍णालयात दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सापाशी खेळणे एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे. कारण यादरम्‍यान सापाने 3 वेळेस युवकाचा चावा घेतल्‍याने त्‍याला गंभीर अवस्‍थेत रुग्‍णालयात दाखल करावे लागले आहे. 


स्‍वत: सापाला चावायला लावले 
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. सोमवारी रात्री खापरखेड्यातील देवेंद्र परमार (37) यांच्‍या घरी एक साप आढळून आला. या सापाला पकडल्‍यानंतर घरच्‍यांना घाबरवण्‍यासाठी देवेंद्रने 3 वेळेस स्‍वत:च्‍या हातावर सापाला चावा घ्‍यायला लावला. 

 

अर्ध्‍या तासानंतर तब्‍येत बिघडली 
सापाने चावा घेतल्‍यानंतर सुरूवातीला देवेंद्रवर काहीही परिणाम झाला नाही. मात्र जवळपास अर्ध्‍या तासानंतर त्‍याची तब्‍येत प्रचंड बिघडली. यामुळे त्‍याला रुग्‍णालयात दाखल करावे लागले. एका दिवसाच्‍या उपचारानंतर त्‍यांची प्रकृती आता स्थिर असल्‍याची माहिती आहे. याविषयी डॉक्‍टरांनी सांगितले की, मनिहार प्रचातीच्‍या सापाने त्‍यांच्‍या हाताचा चावा घेतला. या सापाचे विष अत्‍यंत विषारी असते. मात्र पकडण्‍यात आलेला साप हे एक पिल्‍लू असल्‍यामुळे त्‍याचा कमी परिणाम झाला.'

 

या घटनेबद्दल देवेंद्र सिंह परमार यांच्‍या पत्‍नीने सांगितले की, 'सोमवारी रात्री ते कामावरून घरी आले. यावेळी तोंड धुण्‍यासाठी बेसिनकडे गेलेले असताना त्‍यांना साप दिसला. त्‍याला बाहेर सोडत असताना सापाने त्‍यांच्‍या हाताचा चावा घेतला. थोड्याच वेळाने त्‍यांना असहाय्य वेदना होऊ लागल्‍या. यामुळे आम्‍ही ताबडतोब त्‍यांना रुग्‍णालयात दाखल केले. आता त्‍यांची प्रकृती धोक्‍याबाहेर आहे.' 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...