आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मराठी शब्दशोध’ अॅप, 84 हजारांवर शब्द; मराठी राजभाषादिनी करण्यात आले लोकार्पण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शासकीय कामकाज मराठीतून चालावे यासाठी मराठी भाषा संचालनालयाने तयार केलेल्या मराठी शब्दशोध अॅपचे लाेकार्पण २७ फेब्रुवारी या मराठी राजभाषा दिनी झाले. मात्र, राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद न ऐकवता ते गुजराथीतून ऐकवले जाण्याच्या अनुवाद गोंधळात भ्रमणध्वनी उपयोजकाचे (अॅप) लाेकार्पण हरवून गेले.


शासकीय कामकाज मराठीतून चालावे यासाठी मराठी भाषा संचालनालयाने तयार केलेल्या मराठी शब्दशोध अॅपचे लाेकार्पण मराठी राजभाषा दिनी करण्याचे ठरले. त्यादिवशी भरमसाट कार्यक्रम होते. मात्र नंतर २७ लाच लाेकार्पण करण्याचा निर्णय झाला. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मधु मंगेश कर्णिक, अरुणा ढेरे आदींच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.


असे आहे शब्दशोध अॅप : इंग्रजीधार्जिण्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मराठीतून प्रशासन चालविणे व व्यवहार करणे सोपे व्हावे म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी तज्ज्ञांच्या समित्या नेमून ‘पदनाम काेश’, ‘शासन व्यवहार कोश’, ‘प्रशासन वाक्यप्रयोग’, ‘न्याय व्यवहार कोश’ यासारखे उपयुक्त ग्रंथ तयार करून घेतले. भाषा संचालनालयाच्या नागपूर विभागीय कार्यालयातील उपसंचालक हरिश सूर्यवंशी यांनी अत्यंत मेहनतीने हे मराठी शब्दशोध अॅप तयार केले. यामध्ये चारही ग्रंथांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

 

८४ हजार शब्दांचा समावेश
अॅपमध्ये मराठी शब्दांचा इंग्रजी आणि इंग्रजी शब्दांचा मराठी पर्याय आहे. यामध्ये व्हाॅइस सर्चचाही पर्याय आहे. त्यामुळे शब्द उच्चारताच त्याचा इंग्रजी वा मराठी पर्याय समोर येतो. हे अॅप गुगल प्ले-स्टोअरवरही मिळेल.

बातम्या आणखी आहेत...