आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलितविराेधी कारवाया न थांबल्यास धर्मांतर करीन; मायावती यांचा नागपुरात इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- हिंदुत्ववाद्यांच्या दलितविरोधी कारवायांना त्रासून बाबासाहेबांनी नागपूर येथे लाखोंच्या जनसमुदायासह बौद्ध धर्मात प्रवेश केला. केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर परत दलितविरोधी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या हिंदुत्ववादी संघटनेचा पाठिंबा आहे. या कारवाया थांबल्या नाहीत तर आपणही डाॅ. आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवीत धर्मांतर करू, असा इशारा बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी येथे दिला. 


कस्तुरचंद पार्क येथील जाहीर सभेला हजारोंच्या संख्येने समर्थक आले होते. महाराष्ट्राचे प्रभारी खासदार वीरसिंग व प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांची प्रमुख उपस्थिती होती. मायावती म्हणाल्या,  भाजप सरकार दलितांच्या द्वेषाचे राजकारण करत असल्याने मी राज्यसभेचा राजीनामा दिला.  एनडीएचा अजेंडा फक्त उद्योगपती हिताचा असून, दलितांसाठी त्यात काहीही नाही. राजीनामा दिल्यानंतर मी दलितांसोबतच असून आदिवासी, मुस्लिम व इतर मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी देशव्यापी दौरा करून काम सुरू केले.  काँग्रेसने मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या नाहीत. त्याविरुद्ध आम्ही मोठा लढा दिला. दलितांचा उद्धार आणि बाबासाहेबांना भारतरत्न देण्याच्या अटीवर व्ही. पी. सिंग यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. ओबीसींवर चुकीच्या धोरणांमुळे अन्याय होतोय. बाबासाहेबांना भारतरत्न दिल्यावर आणि मंडल आयोग लागू झाल्याने भाजपाला आवडले नाही. त्यामुळे भाजपाने व्ही. पी. सिंग सरकारचे समर्थन काढले, असा आरोपही त्यांनी केला.  


राम मंदिर होवो नाहीतर दुसरे कोणते मंदिर होवो, याचा फायदा फक्‍त पुजा-यानांच
सध्‍या भाजपला दलितांचा फार पुळका आलेला आहे. मात्र संपूर्ण देशात ओबीसींवर चुकीच्‍या धोरणामुळे अन्‍याय होत आहे. उत्‍तर प्रदेशमधील सरकार दलितांवरील अत्‍याचाराच्‍या प्रकरणात साधी एफआयर देखील दाखल करत नाही. उत्‍तर प्रदेशातील मतदारांना नरेंद्र मोदींनी दिवा स्‍वप्‍न दाखवले आहे. प्रत्‍यक्षात काहीही होताना दिसत नाही. राम मंदिराचा मुद्दा तापवला जात आहे. मात्र राममंदिर होवो नाहीतर दुसरे कोणतेही मंदिर होवो, यामुळे फक्‍त पुजा-यांचे पोट भरणार आहे. दलितांचा यामुळे काहीही फायदा होणार नाही, असे मायावती म्‍हणाल्‍या. तसेच आरएसएसचा हिंदुत्‍ववादी अजेंडा आणि भाजपचे हवाहवाई आमिषांबाबत लोकांमध्‍ये जाऊन त्‍यांना माहिती द्या, असे आदेश त्‍यांनी कार्यकर्त्‍यांना दिले.


आंबेडकरांना भारतरत्‍न दिले म्‍हणून भाजपने समर्थन काढले
काँग्रेसने मंडल कमिशनच्‍या शिफारसी लागू केल्‍या नाहीत, तेव्‍हा याविरोधात आम्‍ही मोठा लढा दिला. दलितांचा उद्धार आणि बाबासाहेबांना भारतरत्‍न देण्‍याच्‍या अटीवरच आम्‍ही व्हि.पी. सिंगांना बाहेरुन पाठिंबा दिला होता. मात्र भाजपला हे आवडले नाही. त्‍यामुळेच त्‍यांनी व्हि.पी. सिंग सरकारचे समर्थन काढले, असा आरोप मायावती यांनी भाजपवर केला.  


खासगी उद्योगातील आरक्षणासाठी लढा देणार
देशभरात अनेक उद्योगाचे खासगीकरण केले जात आहे. मात्र मागासवर्गीयांना त्‍यामध्‍ये आरक्षण नसल्‍याने त्‍यांना त्‍याचा लाभ घेता येत नाही. त्‍यामुळे खासगी उद्योगातील आरक्षणासाठी आम्‍ही लढा देण्‍याच्‍या तयारीत आहोत, असे मायावती यावेळी म्‍हणाल्‍या.  

 

विरोधकांना संपवण्‍याचा प्रयत्‍न
सीबीआय, इन्कम टॅक्स आणि ईडी या चौकशी संस्थांचा वापर करून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्‍याचा आरोपही यावेळी त्‍यांनी भाजपवर केला.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, सभेचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...