आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट : सैनिक कल्याण निधीचा अपहार; संचालक सुहास जतकर निलंबित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- देशासाठी वीरमरण पत्कारणाऱ्या शहीद सैनिकांच्या निधीतून ‘स्व’कल्याण’ साधणारे राज्य सैनिक कल्याण संचालक सुहास जतकर यांना अखेरीस निलंबित करण्यात आले. राज्य सैनिक मंडळाच्या निधीतून जतकर यांनी केलेला कोट्यवधींचा गैरव्यवहार ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणला होता. त्याची दखल घेऊन अखेरीस शासनाने जतकर यांना निलंबित करण्याचे अादेश काढले. तसेच पुण्याचे अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्याकडे सैनिक कल्याण मंडळाचा अतिरिक्त भार साेपवण्यात अाला अाहे.


ध्वज निधीत माेठा घोटाळा, सैनिकांसाठी घरे बांधून फसवणूक, वीरपत्नीचा अवमान, जिल्हा सैनिक वसतिगृहांची नफेखोरी वापर अादींबाबत जतकर यांच्याविराेधात तक्रारी अाल्या हाेत्या. भाजपचे माजी सैनिक कल्याण आघाडी, महिला आघाडी यांनी सुहास जतकरांच्या मनमानी आणि नियमबाह्य कामकाजाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही अनेक तक्रारी केल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...