आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेत सरकारची मध्यरात्रीपर्यंत काेंडी; शेतकरीप्रश्नी खाेत अडचणीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेला उत्तर देणारे कृषी राज्यमंत्री सदा खाेत यांची विराेधकांनी साेमवारी मध्यरात्रीपर्यंत विधानसभेत चांगलीच काेंडी केली. बाेंडअळी, धानाच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने शेतकऱ्यांना अाजवर १००९ काेटींचे वाटप केले. बियाणे कंपन्यांना ९२ काेटी भरपाई देण्याचे अादेश दिले, असे खाेत यांनी सांगितले, मात्र त्यावर विराेधकांचे समाधान झाले नाही. 


दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी हेक्टरी ३० हजारांची मदत देण्याची घाेषणा सभागृहात केली हाेती, त्याचे काय झाले? यापैकी हेक्टरी किती मदत दिली हे जाहीर करा? अशा प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच जाेपर्यंत ठाेस उत्तर मिळत नाही ताेपर्यंत सभागृह साेडणार नसल्याचा इशारा विराेधी पक्षनेेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. त्यामुळे मध्यरात्री बारा वाजेनंतरही हा गाेंधळ सुरूच हाेता. 

बातम्या आणखी आहेत...