आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन वर्गमित्रानेच केला अत्याचार; मुलीला अडीच महिन्यांची गर्भधारणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- भातकुली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या सोळा वर्षीय मुलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीनाने मार्च महिन्यात बलात्कार केला होता. दरम्यान मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला गुरूवारी (दि. २१) शहरात एका डॉक्टरांकडे दाखल केले होते. त्यावेळी डॉक्टरांनी सदर मुलगी तब्बल अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुध्द शुक्रवारी (दि. २२) बलात्काराचा गुन्हा दाखल करून भातकुली पोलिसांकडे प्रकरण वर्ग केले आहे. 


पीडित मुलगी व बलात्काराचा आरोप असलेला मुलगा दहाव्या वर्गात सोबतच शिकत होते. त्यांचे प्रेमसंबध होते. दोघांनीही दहावीची परीक्षा दिली. शेवटचा पेपर संपल्यानंतर परीक्षा केन्द्र असलेल्या शाळेच्या मागील बाजूनेच अल्पवयीनाने मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर २१ जूनला या मुलीला त्रास होत असल्यामुळे तिच्या पालकांनी तीला शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे पालकांना जबर धक्का बसला. तसेच या प्रकाराबाबत रुग्णालयानेच पोलिसांनाही माहिती दिली. या माहितीच्या आधारे फ्रेजरपुरा पोलिसांनी तातडीने रुग्णालयात जावून मुलीचा जबाब नोंदवला. त्यावेळी मुलीने घडलेला घटनाक्रम सांगितला. या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी सतरा वर्षीय युवकाविरुध्द शुक्रवारी (दि. २२) बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र सदर घटना भातकुली ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांनी हे प्रकरण भातकुली पोलिस ठाण्यात वर्ग केल्याचे फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...