आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरात अल्पसंख्याक संचालनालयाची स्थापना, राज्यमंत्री कांबळे यांची घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - अल्पसंख्याक समाजाच्या योजना व महामंडळे यांच्यात समन्वय साधण्याच्या उद्देशाने महिनाभरात अल्पसंख्याक संचालनालय स्थापन करण्याची घोषणा अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधान परिषदेत केली.

 

गेल्या ४ वर्षांपासून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, उर्दू साहित्य अकादमी, वक्फ बोर्ड, अल्पसंख्याक आयोग व हज समिती यांचे अध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी ही पदे रिक्त ठेवून शासन अल्पसंख्याक समाजावर अन्याय करीत असल्याचा मुद्दा आमदार ख्वाजा बेग आणि आमदार हुस्नबानू खलिफे यांनी उपस्थित केला होता.

 

आज ५५ टक्के मुस्लिम समाज स्वयंरोजगारावर उदरनिर्वाह करतो आहे, २९ टक्के मुस्लिम खासगी उद्योगात आहेत. त्यांना या महामंडळांच्या माध्यमातून कर्जाची गरज भासते. परंतु महामंडळावर संचालकच नसल्याने ते प्रत्यक्षात होत नाही. आज सरकारी नोकऱ्यांत फक्त ४ टक्के तर खासगीत फक्त २८ टक्के मुस्लिम आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

बातम्या आणखी आहेत...