आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आमदाराने केले होते हेमामालिनीबाबत वादग्रस्त वक्तव्य; कोर्टाने दिला जामीन, म्हणाले होते....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी अपक्ष आमदार बच्चू कडू यांना जामीन मिळाला आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्याने आमदार बच्चू कडू हे यापूर्वीही अडचणीत आले आहेत.

 

 

हेमामालिनीबाबत केले होते वादग्रस्त वक्तव्य
- अचलपूरमधून अपक्ष आमदार असणाऱ्या बच्चू कडू यांनी नांदेड येथे अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.
- शेतकऱ्यांच्या आत्महत्या दारुमुळे होत असत्या तर हेमामालिनी रोज दारु पिते तिने आत्महत्या केली का? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. 

मंत्रालयात उपसचिवांना केली होती मारहाण
- मागील वर्षी बच्चू कडू यांनी मंत्रालयात उपसचिव बी. आर. गावित यांना मारहाण केली होती. 
- या घटनेनंतर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते.
- त्यानंतर कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती.

 

 

आंदोलनामुळे वेगळी ओळख
- आंदोलनामुळे बच्चू कडू हे लोकप्रिय आमदार म्हणून ओळखले जातात.
- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी केलेली आंदोलने गाजली आहेत.
- वेळप्रसंगी त्यांनी स्वत: नालेसफाई केली आहे. 
- ते 3 वेळा निवडून आले असून रक्तदान आणि आरोग्य शिबीरासारखे उपक्रम ते राबवत असतात.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...