आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आमदार करतात काही मिनिटात नागरिकांची कामे, हे आहे कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- आपल्या नवनवीन आंदोलनामुळे प्रशासनाला ‘सळो की पळो’ करुन सोडणारे अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू सध्या मतदारसंघातील गावा-गावात जाऊन, त्या ठिकाणी आपली राहुटी थाटत आहेत. ‘घंटो का काम मिंटो में’ अशा घोषणेसह जनतेच्या कामासाठी गावा-गावात राहुटी थाटून ग्रामस्थांची शासकीय कामे मार्गी लावली आहेत.

 

 

बच्चू कडू यांच्यासोबत झेरॉक्स मशिन, फोटो काढायची मशीन, सेतू केंद्र, सर्व विभाग वेगवेगळ्या चार चाकीमध्ये असतात. त्याचसोबत, प्रशासनातील अधिकारीही असतात. अगदी नायब तहसीलदार, तलाठी, आरोग्य अधिकारी, पुरवठा अधिकारी, असे अधिकारी-कर्मचारीही सोबत असतात. जागेवरच लोकांची कामं करुन देतात, रेशन कार्ड असो, की श्रावण बाळ योजनेचा फॉर्म भरणे, वयाचा दाखला, अपंगांचा दाखला असो, अशी सगळी कामं एकाच वेळी सर्व अधिकारी सोबत असल्याने तात्काळ होत आहेत.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...